माथेरानच्या वाहनतळासाठी भूखंड द्या- बारणे

| नेरळ | प्रतिनिधी |

दस्तूरी येथील प्रवेशद्वाराजवळ वाहनतळ आहे. मात्र ती जागा अपुरी पडत असल्याने वाहनतळ चे बाजूला शासनाच्या ताब्यातील एमपी 93 हा भूखंड असून तो भूखंड नगरपरिषदेला हस्तांतरीत करावा, अशी मागणी खाचश्रीरंग बारणे यांनी केली आहे.

2013 साली तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांनी वाहनतळ सुस्थितीत आणण्यासाठी एमएमआरडीए मार्फत निधी मंजूर करून आणला होता. मात्र प्रत्यक्ष बांधकाम 2019 मध्ये माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष असताना प्रेरणा सावंत यांनी करून घेतले. त्यासाठी इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या या शहरातील विविध जाचक परवानग्या प्राप्त करून प्रत्यक्षात उतरवले आणि वाहनतळ अद्ययावत करून घेतला. मात्र माथेरान मध्ये येणारे पर्यटक यांची आणि यांच्या वाहनांची संख्या दररोज वाढत आहे.त्यामुळे वाहने उभे करण्यासाठी असलेले वाहनतळ अपुरी पडू लागले आहेत. पर्यटकांना त्रास न होता त्यांचे पर्यटन अधिक आनंदी व्हावे या हेतूने पार्किंगसाठी महसूल विभागाचा एमपी 93 भूखंड नगरपालिकेकडे हस्तांतर होण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी बारणे यांच्याकडे केली होती. बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन हा भूखंड लवकरात लवकर नगरपालिकेकडे वर्ग करण्याची विनंती केली आहे.

Exit mobile version