मोकाट फिरणार्‍या जनावरांना जीवनदान

। रसायनी । वर्ताहर ।

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेले रसायनी पाताळगंगा येथील बजरंगी मित्र मंडळाचे गोमाता संरक्षक मलेश गुडसे यांच्या सहकार्यातून बजरंगी बांधव परिसरातील गोमातांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत.

परिसरातील गोमांताना कोणतीही इजा झाल्यास हे बजरंगी बांधव एकत्रित येतात आणि पशुवैद्यकिय डॉक्टरांशी संपर्क करून गोमातेचे संरक्षण करताना परिसरात दिसतात. यावेळी रसायनी परिसरातील काही गाईंची नखे व शींगे वाढली आहेत, त्यांना चालताना खुप त्रास होतो, अशी माहिती बजरंगी बांधवांजवळ अनेकांनी बोलून दाखविली होती. मोहोपाडा येथील परिसरात एका गाईचे शिंग वक्र असल्याने ती गाय चालताना तिच्या डोक्याला शिंग लागत असल्याने ही गाय जखमी होऊन त्यातून कित्येक दिवस रक्तत्राव सुरू होता. याची दखल घेत बजरंगी बांधवांनी त्या गाईच्या शिंगाचा भाग कापून काढला आणि जखमेवर औषधोपचार केले. बजरंग दलाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी गोरक्षक प्रमुख मलेश गुडसे, अध्यक्ष जनार्दन मालुसरे, संयोजक प्रशांत तांबोळी, गोरक्षक प्रमुख राजा जांभुळकर, सहसयोजक दिनेश पडवळ, नामदेव केदारी, संदीप तांबोळी, सुभाष खुडे, सुभोद मिश्रा आदी उपस्थित होते.

Exit mobile version