। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा प्रवेशद्वाराच्या मासळी बाजारालगत असलेला बसथांब्यात फेरीवाले, गर्दुल्ले तसेच इतर विक्रेते आपले बस्तान मांडत असल्याने या बसथांब्याकडे प्रवासी पाठ फिरवत होते. ही समस्या बजरंगी बांधवांनी लक्षात घेऊन बसथांब्याबाहेरील तसेच आतील परिसर साफ करून धुवून स्वच्छ केला.
बसथांब्याच्या भिंतींना असलेले गुटख्याचे डाग, प्लास्टिक बाटल्या उचलून भिंती घासून आकर्षक चमकवली. यावेळी रसायनी अध्यक्ष जनार्दन मालुसरे, गोमाता संरक्षक मलेश गुडसे, प्रशांत तांबोळी, प्रशांत मोकाशी, राकेश खराडे, विशाल खराटे, केदार भोईर, विनोद सावंत, बाजी, भिमा चलवादी, सचिन भोपतराव आदी उपस्थित होते.
यावेळी राकेश खराडे यांनी लाईटसाठी तात्काळ संपर्क साधून बसथांब्यात लाईटची व्यवस्था उपलब्ध केली. यात बजरंग दलाचे रसायनी अध्यक्ष जनार्दन मालुसरे, प्रशांत मोकाशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यानंतर बजरंगीबांधवानी मोहोपाडा शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीची व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता करून चौकातील परिसर स्वच्छ केला.