| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील सायगावजवळील सकाळच्या दरम्यान लांडोर लंगडत रस्त्यावर जाताना तरुणाच्या निर्दशनास आले. त्याने तात्काळ शिघ्रे येथील माजी सरपंच संतोष पाटील यांना बोलावले. संतोष पाटील यांनी लांडोर पक्ष्याची अवस्था बघून ताबडतोब वनपाल संतोष रेवणे यांना कळविले. ताबडतोब शहरातील वनपाल विजय कोसंबे व सर्पमित्र संदिप घरत व वनमंजूर हेही घटनास्थळी पोहोचले. लांडोर पक्ष्याला ताब्यात घेऊन वनविभाग गेस्ट हाऊसमध्ये आणले. जखमी लांडोरावर पक्षुवैद्यकीय डॉक्टर विनायक पवार यांनी उपचार सुरू केले आहे.
मुरुड शहरासह पंचक्रोशीभागात अनेक ठिकाणी वणवे लागत असल्याने त्यात उन्हाचा तडाखा तेवढाच वाढत असल्याने जंगलातील नैसर्गिक जलसाठे रिकामे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आज एक पक्षी रस्त्यावर आला, उद्या हिंस्त्र प्राणी येऊ शकतो, तरी जंगलात लागणारे वणवे थांबविणे जरुरी आहे, अशी प्रतिक्रिया सर्पमित्र संदीप घरत यांनी दिली.