घारापुरी ग्रामपंचायतीचा गौरव

। उरण । वार्ताहर ।

टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळ्यानिमित्त घारापुरी ग्रामपंचायतीला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दि. 21 ऑगस्ट रोजी उरण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा सोहळा पार पडला.

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वठारकर, आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, डॉ. बाबासो कालेल, सहाय्यक गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर, सदस्या नीता ठाकूर, हेमाली म्हात्रे, भारती पांचाळ, अरुणा घरत, ग्रामसेवक पवित्र कडू, विकास म्हात्रे आणि आरोग्य विभाग व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी घारापुरी, पुनाडे, भेंडखळ, वशेणी, सारडे, गोवठणे या ग्रामपंचायतींना टीबीमुक्त ग्रामपंचायत म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version