| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर येथील पी.पी. खारपाटील कन्ट्रक्शन अँड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पांडुरंग खारपाटील व सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र खारपाटील यांचे पिताश्री परशुराम (आबा) धाकू खारपाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून चिरनेर गावातील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमाच्या व इंग्रजी माध्यमाच्या दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुणानुक्रमे येणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी मृणाली म्हात्रे, विघ्नेश पाटील, सिद्धी गावंड, दिशा चिर्लेकर, पूर्वा ठाकूर, दिया म्हात्रे, तेजस गव्हाणकर, रोहित भोईर, प्रथमेश फोफेरकर, आदिती पाटील, प्रीती जैस्वाल या विद्यार्थ्यांचा पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग खारपाटील, उपाध्यक्ष राजेंद्र खारपाटील, समीर खारपाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले. स्मृतिदिनानिमित्त सोसायटीच्या प्रांगणात बांधण्यात आलेल्या नवीन रंगमंचाचे उद्घाटनही यावेळी उद्योगपती पी.पी. खारपाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी प्रथम उद्योगपती स्वर्गीय आबा खारपाटील आणि वात्सल्यमूर्ती स्वर्गीय ठकुबाई खारपाटील यांच्या विद्या संकुलनात उभारण्यात आलेल्या अर्धपुतळ्यांना उद्योगपती राजेंद्र खारपाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी संचालिका अर्चना ठाकूर, सुनीता खारपाटील, लता ठाकूर तसेच खारपाटील यांचे सर्व कुटुंबीय, प्राचार्य सुरदास राऊत, पर्यवेक्षक आनंद चिर्लेकर, प्रशासकीय अधिकारी व्ही.ए. पाटील, मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे, मंदा घरत, स्मिता मसुरकर तसेच विद्या संकुलनाचे अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.