गणेशोत्सवात योगदान देणार्‍यांचा गौरव

। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोली नगर परिषद हद्दीतील घरगुती आणि सार्वजनिक स्तरावर यंदाच्या गणेशोत्सव आयोजनात, आपले बहुमोल योगदान देऊन नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत सुरक्षा,स्वच्छता आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका वठवलेल्या संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.
खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, मुख्याधिकारी अनुप दुरे,पोलीस अधिकारी हरेश कळसेकर,मोहन औसरमल,बेबी सॅम्युअल,किशोर पानसरे यांच्या उपस्थितित सन्मानपत्र,भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
खोपोली नगर परिषद हद्दीतील वर्ष 2021च्या गणेश उत्सव आयोजनात आपले बहुमोल योगदान देऊन नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत गणेश भक्तांची सुरक्षा, सार्वजनिक स्वच्छता,सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका वठवलेल्या संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा खोपोली नगरपालिका कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात गौरव करण्यात आला.

Exit mobile version