स्कोडा गाडीतील गोवा निर्मितीची दारू जप्त ,चालकास अटक

महाड राज्य उत्पादक शुल्क विभागाची कारवाई

महाड | ग्रामिण प्रतिनिधी |

मुंबई गोवा महमार्गवरील अवैद्य दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच महाड येथील राज्य उत्पादक शुक्ल विभागाने सापळा रचत पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी जवळ एका स्कोडा कारची तपासणी करत गाडी सह गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे सदरची कारवाई सोमवारी रात्री 2 च्या सुमारास करण्यात आली आहे सुमारे चार लाख 18 रुपयांची दारू जप्त केली आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्ग वरून गोवाराज्यातील दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळतात सोमवारी मद्यरात्री 2 च्या सुमारास एक स्कोडा एम एच 08 सी 6897 वरील चालक हेमंत रेडकर सिंधुदुर्ग याच्या कारची तपासणी केली असता या गाडीत 35 मोठे बॉक्स सह काही लहान बॉक्स जप्त करण्यात आले आहेत या दारूचे मूल्य 4 लाख 18 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या सापळा मध्ये निरीक्षक के आर भोसले ,एस टी जाधव , डी वाय वाडेकर ,एस बी महाले आदीनी कारवाई केली या कारवाई अंतर्गत चालक विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version