अलिबाग तालुक्यात एकाच रात्री तीन बोकड व एका बकरीसह दोन करडूंची चोरी

खंडाळा आणि वाघोली येथील दोन घटना; पोलिसांसमोर आव्हान

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील साईनगर खंडाळा तसेच वाघोली या दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच रात्री तीन बोकड एका बकरीसह दोन करडूंची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पहिली घटना 12 ते 13 नोव्हेंबर दरम्यान घडली. मौजे साईनगर, पो.खंडाळा, येथे फिर्यादी रा.साईनगर, पो.खंडाळा, ता अलिबाग यांच्या घरासमोरील अंगणातील एकुण 17 हजार रुपये किमतीचे 1 बोकड व 1 बकरी असे चोरट्यांनी चोरुन नेले होते. सदर प्रकार लक्षात येताच अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस हवालदार रुपेश निगडे हे करीत आहेत.

तर दुसरी घटना वाघोली येथे घडली. येथे देखील 12 ते 13 नोव्हेंबर दरम्यान फिर्यादीच्या बेडयातुन शेखाचे गाव, पो.नारंगी येथे राहणाऱ्या आरोपीने बेडयामधील बांधलेलले एकुण 34,000/-रुपये किमतीचे 02 बोकड व एकुण 10,000/-रुपये किमतीची 01 बकरी व एकुण 5,000/-रुपये किमतीचे दोन पांढरे व तांबडे रंगाचे लहान करडे असे एकुण 49,000/-रुपये किमतीचे बोकड, बकरी आणि करडू चोरून नेले..

याबाबत पोयनाड पोलिस हवालदार नितीन जगताप हे करीत आहेत.

Exit mobile version