| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वरसोली-रामनाथ टॉवर येथून पॅशन प्रो या मोटारसायकलची चोरी झाल्याची घटना रात्री घडली आहे.
निहाल म्हात्रे यांनी आपली पॅशन प्रो क्र. एमएच 06 बीझेड 8456 ही मोटारसायकल ते राहत असलेल्या वरसोली-रामनाथ टॉवर येथे जोशी वाड्यातील आवारात पार्कींग करुन ठेवली होती. मात्र सदर मोटारसासायकल सकाळी सदर ठिकाणाहून गायब असल्याचे निदर्शनास आले. निलाह म्हात्रे यांनी सदर मोटारसायकलचा सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेच न सापडल्याने मोटारसायकलची चोरी झाल्याची तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात देण्यास गेले होते. मात्र पोलिसांनी गाडीचा शोध घेण्यास सांगून जर दिवसभरात आढळली नाही तर अज्ञात चोरटयाविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले.
दरम्यान याच ठिकाणाहून दोन तीन दिवसांपूर्वी दोन तीन पंख्यांची चोरी झाल्याचे सांगण्यात आले आहे. चोरीला गेलेली सदर मोटारसायकल कुणाला आढळल्यास संबंधीतांनी निहाल म्हात्रे यांच्याशी 8390097346 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.