गोध्राकांड: मोदींना क्लीनचीट

प्रकरणावर सुनावणी सुरु
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गुजरातमध्ये गोध्रा प्रकरणानंतर राज्यभर उसळलेल्या दंगलीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना विशेष तपास पथकाने दिलेल्या क्लीन चिटला आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.
काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी यांची विधवा झाकिया जाफरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू असून न्यायालयाने नरेंद्र मोदी व अन्य अनेक प्रशासकीय व पोलीस अधिकार्‍यांना दोषमुक्त करणारा अहवाल पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या आणि अनेक अर्थाने वादग्रस्त ठरलेल्या प्रकरणी अद्याप न्याय होण्याची आशा निर्माण झालेली आहे.
श्रीमती जाफरी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. सदर याचिका प्रशासकीय यंत्रणेतील नोकरशाहीची निष्क्रियता, पोलिसांची पक्षपाती आणि ढिली भूमिका यासह एका षडयंत्राद्वारे येथे हिंसाचार भडकवण्याच्या व्यापक कटाशी संबंधित आहे.असे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे.

Exit mobile version