| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गोरोबानगर, नागोठणे येथील व रूची हॉटेलच्या पाठीमागे राहणार्या प्रणाली हेमंत मढवी (24) यांचे अज्ञात चोरट्याने एकूण 72 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केले. याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पो.ह. राजेश जगताप हे करीत आहेत.