। पनवेल । प्रतिनिधी ।
नवीन पनवेल येथील घरात प्रवेश करून चोरांनी तीन लाख तीस हजार रुपयांचे दागिन्यांची चोरी केली. या प्रकरनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अजय काथे हे सेक्टर एक नवीन पनवेल येथे राहत असून, ते त्यांच्या घरात कुटुंबासह झोपलेले असताना चोरांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूला असलेल्या लोखंडी गेटला असणारे कुलूप तोडले आणि तळमजल्याला असलेल्या लाकडी खिडकीतून घरात प्रवेश केला आणि तिसऱ्या मजल्यावरून बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील दागिने चोरून नेले.







