| पनवेल | प्रतिनिधी ।
राहते घर स्वतःच्या नावे करून देत नसल्याने मुलाने त्याच्या दोन मित्रांसह बापाला मारहाण केल्याची घटना भाताण पाडा येथे घडली. या प्रकरणी मुलगा भरत बाळकृष्ण मुकादम आणि त्याच्यासोबत असलेले दोन मित्र परशुराम घरत आणि भैय्या यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार बाळकृष्ण मुकादम त्यांचा मुलगा भरत मुकादम त्याच्या नावावर राहते घर करून देत नाही याचा राग मनात धरून भरत मुकादम आणि त्याचे दोन मित्र परशुराम घरत आणि भैय्या यांनी बाळकृष्ण मुकादम यांना शिवीगाळ केली आणि हाताबुक्याने मारहाण केली यावेळी तक्रारदार यांची पत्नी सोडवण्यात आली असता तिला देखील भरत याने हाताबुक्याने मारहाण केली आणि लाथ मारून घराच्या पायरीवरून खाली ढकलली, यात त्या जखमी झाल्या.







