सोन्याचे दागिने चोरणाऱ्यांना बेड्या

| पनवेल | प्रतिनिधी |

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा कक्ष 03, पनवेल यांनी अटक करून त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये काही अनोळखी आरोपी हे मोटारसायकलवरून भरधाव वेगाने येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे किमती व मौल्यवान दागिने जबरीने खेचून जबरी चोरी करत असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल आहेत. अशा गंभीर गुन्ह्यांची तात्काळ उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह. पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सचिन गुंजाळ यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी मोहम्मद शफिक हनिफ शाह (28), विवेक विश्वनाथ सोनार (25), आदर्श हरिसिंग दर्जी (25) या आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 9,93,500/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Exit mobile version