| रायगड | प्रतिनिधी |
गंगानगर राजस्थान येथे दि. 6 ते 9 जून या कालावधीत राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत 47 किलो वजनी गटात रायगडची आंतरराष्ट्रीय पदक विजेती ‘अमृता ज्ञानेश्वर भगत’ हिने सुवर्णपदक प्राप्त केले. अमृताच्या या यशाबाबत तिचे प्रशिक्षक ‘विक्रांत गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला आहे. जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अमृताने ठसा उमटवून राष्ट्रीय स्पर्धेत सुद्धा पदक प्राप्त केले. त्याबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, तसेच सदस्य माधव पंडित, सुभाष टेंबे, सचिन भालेराव, दत्तात्रय मोरे, खजिनदार राहुल गजरमल यांनी अभिनंदन केले आहे.
रायगडच्या अमृता भगतला सुवर्णपदक
