सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू मालामाल

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

यंदाच्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या अ‍ॅथलिट्ला रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा ऐतिहासिक निर्णय जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेने घेतला आहे. बुधवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटना असा निर्णय घेणारी पहिली आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटना ठरली आहे.

प्रत्येक चार वर्षांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडून मिळणार्‍या वाट्यातून तब्बल 2.4 लाख अमेरिकन डॉलर्सचे एकूण पुरस्कार देण्यात येणार आहे. पॅरिसमध्ये अ‍ॅथलेटिक्स या क्रीडा प्रकारात एकूण 48 इव्हेंट होणार असून त्यातील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्याला अनुक्रमे 50 हजार अमेरिकन डॉलर्सचा रोख पुरस्कार मिळेल. भविष्यात यात वाढ होऊ शकते, तसेच 2028च्या लॉस एंजल्स ऑलिंपिकमध्ये रौप्य व ब्राँझपदक विजेत्यांनाही रोख पुरस्कार देण्यासाठी जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटना कटिबद्ध आहे.

Exit mobile version