नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी झारखंडची ‘सुवर्णकन्या’ तिरंदाज दीपिका कुमारीला 50 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये दीपिकाने भारतासाठी तीन सुवर्णपदके जिंकली. दीपिका आणि तिचा पती अतानू दास या जोडीने आधीच ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली आहे. या दोघांकडूनही पदकांची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्र्यांनी शनिवारी झारखंडच्या खेळाडूंशी ऑनलाइन संवाद साधला. त्यांनी आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकविजेत्यांसाठी बक्षीस रकमेची घोषणा केली. 23 जुलैपासून सुरू होणार्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणार्या झारखंडच्या खेळाडूंना मुख्यमंत्र्यांनी 2 कोटी रुपये, रौप्य पदक विजेत्यास 1 कोटी आणि कांस्यपदक जिंकणार्याला 75 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.