। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर कुंभारपाडा हे मूर्तीकला आणि मातीची भांडी यासाठी प्रसिद्ध आहे. लोकांनी संसार उपयोगी मातीची भांडी वापरण्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे मातीची भांडी वापरण्याचे प्रमाणही कमी झाले होते. परंतु अलीकडे वाढते प्रदूषण आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा अतिरिक्त वापर यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा अनुभव लोकांना येऊ लागल्याने, पुन्हा एकदा अन्न शिजवण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर होताना दिसू लागला आहे. अनेक लोक मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणे पसंत करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातूनही मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे मातीची भांडी बनविणार्या कारागिरांना सुगीचे दिवस आले आहेत.
मातीच्या भांड्यात अन्नाची चव आणि पोषणतत्वे टिकून राहत आहेत. त्यातून अन्नाची चव पौष्टिकता आणि सुगंध अधिक वाढतो. त्यामुळे सध्या बहुतांशी लोक मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे पसंत करत आहेत. या मातीच्या भांड्यांना खूप मागणी आहे त्यामुळे येथील कुंभार कारागिरांचा व्यवसाय देखील चांगला वाढत आहे. मातीची भांडी आणि कुंभारकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. विशेष म्हणजे मातीच्या भांड्यात अन्नाची चव व पोषक तत्वे टिकून राहत असून, अन्नाची चव, पौष्टिकता व सुगंध अधिक वाढतो. त्यामुळे सध्या ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील नागरिक देखील मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे पसंत करीत आहेत. मातीची मातीच्या भांड्यांना वाढती मागणी असल्यामुळे आमच्या कुंभार व्यवसायला व कारागिरांना रोजगार उपलब्ध होत आहे.







