खुशखबर! पीएनपी प्रवासी बोटसेवा उद्यापासून सुरु

| अलिबाग | प्रतिनिधी |

दोन महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पीएनपी प्रवासी बोट सेवा 1 सप्टेंबरपासून सुुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना आता जलमार्गाने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. सकाळी सव्वा आठ ते सायंकाळी सव्वा चार वाजेपर्यंत ही सेवा सुरु राहणार असल्याची माहिती पीएनपी कॅटरमनमार्फत कळविण्यात आले आहे.

पावसाच्या हंगामात वादळामुळे उधाणाचा धोका अधिक असतो. त्यामुळे जून ते ऑगस्ट या दोन महिन्याच्या कालावधीत प्रवासी जलवाहतूक सेवा बंद ठेवली जाते. शासनाच्या सुचनेनुसार गेली दोन महिने पीएनपी प्रवासी बोट सेवा बंद करण्यात आली होती. अखेर या दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर ही सेवा पुर्ववत सुरु करण्यात आली आहे. मांडवा बंदर ते गेट वे ऑफ इंडिया असा जलप्रवास असणार आहे. मुंंबईकडे जाणाऱ्या व मुंबईहून अलिबागकडे येणाऱ्या प्रवाशांना अवघ्या 45 मिनीटात निश्चितस्थळी पोहचता येणार आहे. पीएनपी बोट एक सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version