| वेणगाव | प्रतिनिधी |
गणेशोत्सव म्हंटलं कि, कितीही आव्हानं येऊदे, कोकणकर गावाकडची वाट धरतातच. गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. दरवर्षी गणशोत्सवासाठी कोकणात जाणं म्हणजे एक दिव्यच असतं. खासगी वाहन असो किंवा सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय, गावाला जाण्यासाठी शक्य त्या माध्यमांची मदत कोकणकर घेतात. अशाच सर्व कोकणकरांसाठी खुशखबर असून माधवी नरेश जोशी व त्यांच्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी मोफत बस सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोईमुळे कोकण वासियांना आपल्या घरी गणेशोत्सवासाठी जाण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल येथे वास्तव्यास असलेलेकोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील रहिवाशांसाठी विनामूल्य ही बस सेवा पुरवण्यात येणार आहे. 15 ते 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता ही बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. http://bit,/ free-bus -nondani2023 या लिंकच्या माध्यमातून प्रवाशांनी आपली नोदणी 14 सप्टेंबर 2023 पर्यंत करणे अनिवार्य असणार आहे.
महत्त्वाची बाब, म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघातील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल या शहरी भागातील रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नागरिकांना ही बस सेवा पूरवली जाणार आहे. तसेच यासाठी प्रवाशांचे आधारकार्ड व त्या आधारकार्डवरील पत्ता हा खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली शहरातील असणे गरजेचे आहे, असे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जेणेकरून या भागातील चाकरमान्यांना बस सेवेचा लाभ मिळेल. ही बस खारघर हिरानंदानी चौक, कळंबोली मॅकडोनल्ड तसेच पनवेल एसटी स्टँड बाहेरून सोडण्यात येणार थेट खेड, चिपळूण, हातखंबा, कणकवली, कुंडाळ, सिंधूदुर्ग या थांब्यावरील प्रवाशांना या बस सेवेचा लाभ घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9004433998 तसेच 9819456194 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आव्हान माधवी नरेश जोशी यांच्याकडून करण्यात आले आहे.