ICC महिला क्रिकेट विश्वचषक, न्यूझीलंड महिलांविरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला टीम हा सामना नुकताच पार पारपडला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. अखेर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 141 धावांनी पराभूत केले.
वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे सुरू असलेल्या महिला विश्वचषकाच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने रविवारी न्यूझीलंडचा 141 धावांनी पराभव केला. 270 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 129 धावांत गारद झाला कारण डार्सी ब्राउनने 22 धावांत तीन बळी घेतले. तत्पूर्वी, एलिस पेरी आणि ताहलिया मॅकग्रा यांनी अर्धशतके झळकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 8 बाद 269 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी लेह ताहुहूने तीन बळी घेतले.
महाराष्ट्रात सर्वात जास्त गुगलवर सर्च होणार हा सामना असून न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना गुगल ट्रेंडिंगवर ब्रेकआउट झाला आहे.