भालीवडी सहकार सोसायटीवर शेकापचे गोपाळ आगज अध्यक्षपदी

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील भालीवडी या सर्वसाधारण विविध विकास कार्यकारी सोसायटीमध्ये अध्यक्ष पदावर गोपाळ आगज यांची तर उपाध्यक्ष म्हणून मज्जीद नार्लेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यावेळी अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे गोपाळ आगज यांची बिनविरोध तर उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मज्जीद नार्लेकर यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रसंगी संचालक दत्तात्रय भोईर,
मधुकर पाटील, महेश कोळंबे, सुदाम कार्ले, सचिन कांबरी, दिपक भोईर, बजरंग श्रीखंडे, सुदाम भोईर, मनोहर निकाल, अनिता थोरवे आणि सरिता भोईर आदी संचालक उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विलास थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव, प्रभारी तालुका चिटणीस श्रीराम राणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, गजानन पेमारे, कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड, शेकाप पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष महेश तुकाराम कोळंबे, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश फराट, विभागीय चिटणीस पांडुरग बदे आदी उपस्थित होते.

Exit mobile version