गोविंद बैकर यांचे तृतीय पुण्यस्मरण

| माणगाव | प्रतिनिधी |

सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या कै. गोविंद बैकर यांचा तृतीय पुण्यस्मरणदिन गुरुवार, दि. 16 मे रोजी माणगाव तालुक्यतील बहुलेवाडी या ठिकाणी संपन्न झाला. यानिमित्ताने गोविंद बैकर यांच्या स्नेहीजणांचा सत्कार व गुणगौरव तसेच ग्रामस्थांना उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

आई-वडिलांची सेवा हेच पुण्यकर्म या विषयावर या निमित्ताने अजित शेडगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आधुनिक काळातील व्यस्त जीवन व कौटुंबिक नातेसंबंध, ज्येष्ठांची होणारी परवड, वृध्दाश्रम तसेच आई वडील यांची सेवा या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते, आदर्श शिक्षक सुनील बैकर व कुटुंबियांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर हेमंत बारटक्के, भागोजी पिंगळे, कमलाकर मांगले, बळीराम चोगले, पंढरीनाथ दळवी, रमेश कचरे, भिकू तात्या जाधव, यशवंत तांबट, विजय येलवे, आमिष भौड, राजू थितेकर, राजेश वारगे, कांतीलाल कसबले, रोशन फराडे, सरपंच अनिता सर्फले, ग्रामस्थ, महिला, तरुण, कै. गोविंद बैकर यांचा परिवार मुलगे, मुली जावई नाती आदी उपस्थित होते.

Exit mobile version