पदवीधरांनो मतदार नावनोंदणी करा

मुरुड तहसीलदारांचे आवाहन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

पदवी प्राप्त केलेल्या तरूण तरुणींनी आपली पदवीधर मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी केली आहे. ही नोंदणी मोहीम 30 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. यामध्ये जुन्या यादीत असलेल्या मतदारांनीसुद्धा पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नोंदणी करिता आवश्यक कागदपत्रे मार्कशिट किंवा पदवी प्रमाणपत्र, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, रेशन कार्ड किंवा लाईट बिल, नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी किंवा कार्ड, (नोंदणी करणारा मतदार हा ऑक्टोबर 2020 पर्यंत पदवीधर झालेला असावा त्यानंतर पदवीधर झाला असेल त्यांनी फॉर्म भरू नये.) एक पासपोर्ट साइज कलर फोटो. सर्व झेरॉक्स वर आपली सही करून पदवीधर मतदारसंघ नाव नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले.

अधिक माहितीसाठी शासन निर्णय दि.26 सप्टेंबर पहावा. मुख्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/forms.aspx बघावे. तसेच, नाव नोंदणीसाठी नमुना नंबर 18 सोबत जोडला आहे अशी माहिती मुरुड तहसीलदार यांनी दिली.

Exit mobile version