कोंकण ज्ञानपीठात पदवीदान समारंभ

| कर्जत | वार्ताहर |

कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न झाला. कोंकण ज्ञानपीठ फार्मसी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पदवीदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रजनी शेट्टीगर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाची सुरुवात करण्यात आली. डॉ. काळे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविकात संस्थेची व महाविद्यालयाची माहिती सांगितली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्जत महाविद्यालयातील विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना पदवीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर फार्मसी महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता भांगरे यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपचंद्र शृंगारपुरे, विजय मांडे, प्राचार्य डॉ. मोहन काळे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत गोंधळी, प्राचार्या डॉ. स्मिता टाकरखडे, डॉ. अमोल चांदेकर, डॉ. अतुल रेंगे, प्रा. भगवान डावरे, प्रतीक्षा वासनकर, डॉ.एस.बी.पाटील, डॉ. निलोफर खान, डॉ. सतीश पांडव, प्रा. स्वप्नील फालक, प्रा. मनिषा चौधरी, प्रा. अश्‍विनी भोईर, आदी उपस्थित होते.

Exit mobile version