14 रिक्तपदांसाठीचा कार्यक्रम जाहिर
| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील एकूण 6 ग्रामपंचायतींमधील 14 रिक्तपदांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. काही सदस्यांच्या निधनामुळे व काही सदस्य अपात्र ठरल्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुका दि.28 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत पार पडणार आहेत. तर दि.29 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून तळा तहसिल कार्यालयात मतमोजणी पार पडणार आहे.
तळा तालुक्यातील रहाटाड, चरईखुर्द, भानंग, मांदाड, निगुडशेत, तळेगाव या ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. काही सदस्यांच्या निधनामुळे व काही सदस्य अपात्र ठरल्यामुळे एकूण 14 जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिडणुकीसाठी उमेदवारांची नामनिर्देशन पत्र लेखी प्राधिकृत केलेल्या त्यांच्या प्रतिनिधीमार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दि.7 ते 13 एप्रिल रोजी (दि.11 व 12 एप्रिल वगळून) सकाळी 11.00 ते 3.00 वाजेपर्यंत तळा तहसिल कार्यालयाच्या पहिला मजल्यावरील ग्राम न्यायालयात स्वीकारली जाणार आहेत. दि.15 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. त्यांनतर दि.17 एप्रिल रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ निर्धारित करण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी 3.00 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक लढविण्यास आल्यास त्यासाठीचे मतदान दि.28 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. त्यानंतर दि.29 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून तळा तहसिल कार्यालयच्या पहिला मजल्यावरील ग्राम न्यायालयात मतमोजणी पार पडणार आहे. अशाप्रकारे 14 जागेवर पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधारी गटाला आपली सत्ता टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
ग्रामपंचायतीचे आरक्षण
रहाटाड प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जमाती महिला, चरइखुर्द प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जमाती महिला व अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 3 ना.मा.प्र. महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, मांदाड प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण महिला, भानंग प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण महिला, निगुडशेत प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती महिला, तळेगाव प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला.
