। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवगावमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होत असून आत्तापर्यंत 33.86 टक्के मतदान झाले आहे. या निवडणूकीत 2 उमेदवार थेट सरपंचपदासाठी तर 22 उमेदवार सदस्यपदासाठी रिंगणात उतरले आहेत.
या ग्रामपंचायत हद्दीत एकूण एकूण 3 हजार 130 मतदार असून त्यामध्ये 1617 पुरुष तर 1593 महिला मतदार आहेत. यापैकी 1 हजार 60 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नवगावमध्ये एकूण 4 प्रभागात ही निवडणूक लढवली जात आहे.