ग्रामपंचायत निवडणूक: महाडमध्ये पहिल्या फेरीत गोगावलेंचे पारडे जड

| महाड | जुनेद तांबोळी |

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली. मंगळवारी (दि.२०) मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या फेरीत 16 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतीत महाड तालुक्यात आ. भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने निवडणुकीत वर्चस्व मिळविले आहे.

आज मंगळवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायतच्या पहिल्या राऊंडच्या 16 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायत गोगावले यांच्या ताब्यात गेले असून पाच ग्रामपंचायतींवर आघाडीने सत्ता काबीज केली आहे. यामध्ये अंबवडे, वाळसुरे, सावट, कोठेरी व गोंडाळे ग्रामपंचायतचा समावेश आहे.

Exit mobile version