| महाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली. मंगळवारी (दि.२०) मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत ३२ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतीत महाड तालुक्यात आ. भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने निवडणुकीत वर्चस्व मिळविले आहे.
आज मंगळवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायतच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या ३२ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायत गोगावले यांच्या ताब्यात गेले असून ११ ग्रामपंचायतींवर आघाडीने सत्ता काबीज केली आहे. यामध्ये अंबवडे, वाळसुरे, सावट, कोठेरी, गोंडाळे, चिंभात, लाडवली, वरंध, गोटे, मोहप्रे व गांधारपाले ग्रामपंचायतचा समावेश आहे.