ग्रामपंचायतींचे पथदिवे केले बंद; महावितरणची कारवाई

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे,साखरोणे,वडशेत-वावे,धारवली या ग्रामपंचायत हद्दीतील वीज देयके न भरल्यामुळे महावितरणने कारवाई करत २५ मे रोजी ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे बंद केल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. शहरातील क्लासेस् आटोपून सायंकाळी गावात जाणारे विद्यार्थी तसेच किराणा खरेदी साठी सायंकाळी दुकानात जाणार्या महिलावर्गाला पथदिवे बंद केल्यामुळे काळोखातून खरेदी साठी ये जा करणे त्रासदायक ठरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदे कडून पंचायत समिती अनुदान येतं असुन पंचायत समिती कडून देयके पुर्ण केली जातात.पंचायत समिती कडून देयकाला उशीर झाला आहे.गटविकास अधिकारी यांनी महावितरण कार्यालयाला विनंती केली होती वीज देयकासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.पथदिवे खंडित करू नयेत.तरीही महावितरण कडून पथदिवे बंद करण्यात आले.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून काळोख पडला की जनावरं थंडाव्यासाठी बाहेर पडतात.संध्याकाळी कामानिमित्त रहिवाशांची रस्त्यावरून ये जा सुरू असते.काळोख एखाद्याचा सर्पावर चुकून पाय पडला तर किती महागात जाईल?महावितरणने काही तरी पर्याय काढावा

-सागर सावंत, ग्रामस्थ(वडशेत वावे)


Exit mobile version