देवघर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन

माजी सभापती संदीप घरत यांची उपस्थिती
। चौल । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील देवघर येथे देवघर प्रीमियर लीग (डीपीएल) क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी अलिबाग पंचायत समितीचे माजी उपसभापती संदीप घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वरंडे ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर चेरकर, जितीन गोंधळी, प्रमोद घरत, अशोक म्हात्रे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. माजी उपसभापती संदीप घरत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा भरविण्यात येणार आहे. गावातील तरुण पिढीमध्ये एकोपा व एकमेकांबद्दल जिव्हाळा राहावा, हीच या स्पर्धेमागची भावना आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचा थरार पाहण्यासाठी देवघर व पंचक्रोशितील तमाम क्रिकेटरसिकांनी मोठी गर्दी केली आहे.

स्पर्धा देवघर गावापुरती मर्यादित असून, यामध्ये गावातील तरुणांचे सहा संघ सहभागी होणार आहेत. आयपीएलच्या धर्तीवर प्रत्येक संघाची मालकी देण्यात आली आहे. त्यात संदीप घरत( ध्रुव फायटर्स), प्रमोद घरत (श्री गणेश चैलेंजर्स), मयूर घरत (रुद्रम चॅलेंजर्स), सचिन आमरे (रिया टायगर्स), परिश म्हात्रे (ओम साई डेकोरेटर्स), आकीब दावीलकर (आकीब वॉरियर्स) या संघांचा सहभाग असणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक श्री विघ्नहर्ता मित्र मंडळ देवघर मेहनत घेत आहे. साखळी स्वरूपात खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेतील प्रत्येक सामन्याची उत्सुकता सर्व खेळाडूंना व क्रिकेट रसिकांना निर्माण झाली आहे. या स्पर्धेचे कृषीवल माध्यम प्रायोजक असून, स्पर्धेचा अंतिम निकाल आपल्याला Krushival.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

Exit mobile version