आरोग्य तपासणीस जनतेचा उत्तम प्रतिसाद

। उरण । वार्ताहर ।
नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, प्रत्येकाला निरोगी, सुंदर आयुष्य जगता यावे या दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ उरण,उरण डॉक्टर असोसिएशन, राजे शिवाजी मित्र मंडळ यांच्या वतीने बुरुड आळी, उरण शहर येथे मेगा मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या मेडिकल कॅम्पला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
मेगा मेडिकल चेकअप कॅम्पचे उद्घाटन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत व लूनकरण तावरी यांच्या हस्ते करण्यात आले.सदर शिबिरामध्ये छाती-ईसीजी तपासणी,रक्त तपासणी,थायरॉईड तपासणी,डायबेटीस तपासणी,ब्लड प्रेशर,स्त्रीरोग,हाड व संधिवात,डोळे तपासणी,त्वचारोग,दंतचिकित्सा,बिंदू शस्त्रक्रिया आदी विविध रोगाशी संबंधित तपासणी करण्यात आले.
यावेळी डॉ. संतोष गाडे, डॉ. संतोष वर्मा, डॉ. प्रीती गाडे,डॉ.आकाश भारती, डॉ. प्रशांत पवार, डॉ. राहुल वर्मा, डॉ. शिवानी गाडे, डॉ.चेतन पाटील,डॉ अमोल गिरी,डॉ. सविता गिरी,डॉ.अमोल गिरी, डॉ. अनिता कोळी, डॉ. क्लिटा परेरा आदी डॉक्टरांनी शिबिरात येणार्‍या नागरिकांची, रुग्णांची तपासणी करून रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन केले.नागरिकांचे सर्व तपासण्या मोफत करुन रुग्णांना मोफत औषधे,गोळ्या देण्यात आले.

Exit mobile version