कोंकण भवनात समूह राष्ट्रगीत गायन

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणार्‍या स्वराज्य महोत्सव या उपक्रमांतर्गत कोकण भवनात उपआयुक्त मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

यावेळी मकरंद देशमूख उपआयुक्त, रवि पाटील उपआयुक्त, वैशाली चव्हाण, सोनाली मुळे, कमलेश नागरे, कोंकण विभाग नगररचनाचे सहसंचालक जितेंद्र भोपळे, कोंकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ तसेच विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. समूह राष्ट्रगीत गायना नंतर वंदेमातरमम आणि भारत माता की जयफ या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांमुळे कोकणभवन इमारतीचा परिसर देशभक्तीमय झाला. यावेळी दि. 10 ऑगस्ट 2022 रोजीच्या शासन निर्णयात दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

Exit mobile version