। उरण । वार्ताहर ।
पावसाळा सुरु होण्याची चाहूल लागली अन् ताडपत्री घेण्याकडे नागरिकांची लगबग सुरु झाल्याचे चित्र उरण बाजार पेठेत दिसू लागले आहे. पावसाळा सुरु होण्याचर चाहूल लागल्याने आपल्या घरामध्ये पावसाचे पाणी जाऊ नये तसेच आपली सर्व सामुग्री भिजून नुकसान होऊ नये यासाठी घरावर ताडपत्री टाकून संरक्षण केले जाते. दर वर्षीप्रमाणे यंदाही उरण बाजार पेठेतील दुकानांत विविध कंपनीच्या ताडपत्री विकायला आल्या आहेत. निळ्या, लाल, पिवळ्या व वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. यावेळी ताडपत्री विक्रेत्यानी सांगीतले की, पावसाळा सुरु झाला कि आम्ही वेगवेगळ्या कंपनीच्या ताडपत्री आणत असतो. सध्या 50 ते 70 रुपये मीटर व 3 रुपये 20 पैसे चौरस फूट या भावाने असलेले रेडीमेड ताडपत्री आम्ही विकतो.