गुजरात विधानसभा निवडणुक! 1 आणि 5 डिसेंबरला होणार मतदान

। बडोदा । वृत्तसंस्था ।

गेल्या 25 वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणार्‍या आपनेही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतलीय. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होम ग्राऊंडवर यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि.3) पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरला, तर दुसर्‍या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबरला होणार आहे. तसेच निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहे.

Exit mobile version