गुणाजी जाधव यांचे निधन

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील धानकान्हे गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कुशल शेतकरी गुणाजी तुकाराम जाधव यांचे रविवार (दि.5) वयाच्या 65 व्या वर्षी राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, पुतणे, एक मुलगा, तीन मुली, सुना,जावई, नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी मंगळवारी (दि.14) तर अंतिम धार्मिकविधी गुरुवारी (दि.16) त्यांच्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडूंन देण्यात आली आहे.

Exit mobile version