| रोहा | वार्ताहर |
वैद्यकीय क्षेत्रात हातखंडा असलेले रोहे तालुक्यातील अमृता परिचारिणी हॉस्पिटलचे प्रख्यात सर्जन डॉ. निशिथ ध्रुव यांचे निधन झाले. डॉ. ध्रुव हे वरसे येथील त्यांच्या घरात स्टूलवरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांना तातडीने डॉ. जाधव नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांना पुढील उपचारार्थ त्वरित मुंबई येथील भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान गुरुवारी रात्री (दि.12) मुंबई येथे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 70 वर्षाचे होते. येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर त्यांनी रोह्यात स्वतःच्या मालकीचे हॉस्पिटल उभारले. रोहे व तालुक्यासाठी त्यांनी 40 वर्षे वैद्यकीय सेवा केली. त्यांचे फार मोठे योगदान होते. त्यांच्या अकाली निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात डॉ.पूर्वी ध्रुव व सुपुत्र डॉ.अभिलाष ध्रुव, सून, नातवंडे असा परिवार आहे.