| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेच्या धडक कारवाईचा धसका घेत कळंबोली वसाहतीत जागा मिळेल तिथे हातगाडीवर व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. यामुळे वसाहतीमधील रस्ते हातगाडीमुक्त झाल्याने पालिकेच्या या कारवाईबाबत नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
कळंबोली वसाहतीमधील रस्ते आणि नाल्यांचे काम पालिकेच्या वतीने हातात घेण्यात आले आहे. या कामामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच भर म्हणून अनेक फेरीवाले रस्त्यावर हातगाड्या उभ्या करून व्यवसाय करत असल्याने वाहन चालक आणि नागरिकांच्या अडचणीत भर पडत असल्याची बाब लक्षात आल्याने पनवेल पालिकेच्या कळंबोली येथील अतिक्रमण विभागाच्या वतीने हातगाडीवर फेरीवाला व्यवसाय करणार्या व्यावसायिकाविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या धडक कारवाईदरम्यान जेसीबी मशीनच्या सहाय्याने हातगाड्या तोडण्यात येत असल्याने धास्तावलेल्या फेरीवाल्यांनी रस्त्यावर हातगाड्या लावणे बंद केले आहे.