गुरुजींनी सजविले कार्यालय

Exif_JPEG_420

पंचायत समिती इमारतीचे केले सुशोभिकरण

कोर्लई | वार्ताहर |
ज्ञानदानाबरोबरच शिक्षकांचा सामाजिक कार्यात शिक्षकांचा मोठा सहभाग असतो. पंचायत समिती मुरुड येथील पंचायत समिती कार्यालय सुशोभिकरण करणे, सुविचार काढणे, लोगो तयार करणे, फलक लेखन करणे, चित्र काढणे आदी बाबींनी माझी पंचायत समिती सुंदर पंचायत समिती हे ब्रीदवाक्य जपून शिक्षकांनी या कामात सहकार्य केले
यात चोरढे मराठी शाळेतील राजेंद्र नाईक, देवानंद गोगर, शाळा ताडगाव जगदीश चवरकर, शाळा चिकणी राजेंद्र साळावकर, शाळा तळेखार हेमंत म्हात्रे, संतोष खैरे, राजेंद्र पाटील, अनंत थळे या शिक्षकांनी एक दिवस संपूर्णपणे पंचायत समिती सजावटीसाठी दिला. याअगोदर या शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालय सुशोभित केलेले होते. याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष वाणी, गटशिक्षणाधिकारी बी.के. पाखरे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला.
असे शिक्षक जर सर्वच तालुक्यात कार्य करू लागले, तर सर्वच पंचायत समिती सुंदर व सुरेख होतील. सर्वसामान्य माणसांना प्रत्येक कक्ष समजण्यास सोपा जाईल, तसेच एक आदर्श व देखणी वास्तू पंचायत समितीचे उभे राहील. शिक्षकांनी केलेले ज्ञानदानाबरोबरच हे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचा गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी बी.के.पाखरे यांनी उल्लेख करून सर्व शिक्षकांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

Exit mobile version