अलिबाग पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील संगम येथील गुटखा माफियाच्या घरात लाखोंचा गुटखा सापडल्याची चर्चा आहे. अलिबाग पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी (दि.2) दुपारी ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईने गुटखा विक्रेत्यांना दणका मिळाला आहे. गुटखा माफियाच्या घरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांना मिळाली. अलिबाग पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्तरित्या गुरुवारी दुपारी कारवाई केली. या कारवाईत एक लाखहून अधिक रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आल्याची चर्चा आहे. कारवाईची प्रक्रीया अद्याप सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
