| पनवेल | वार्ताहर |
तळोजा पोलिसांनी दोन लाखांचा गुदखा जप्त केला. या प्रकरणी रामसिंग रेहवतसिंग टेवडा रा. सेक्टर दोन तळोजा याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तळोजा सेक्टर 2 येथील सोसायटीच्या शॉप मध्ये गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी शॉप मध्ये गुटख्याच्या पिशव्या सापडून आल्या. दोन लाख 1 हजार 530 रुपयाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला
लाखो रुपयांचा गुटखा जप्त
