| माजगाव | वार्ताहर |
राजिप शाळा माजगाव येथे ज्ञानदीप महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्राचे केंद्रीय प्रमुख जे.पी.परदेशी यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक साहित्य निर्मिती, फलक लेखन, स्पॉट स्पीच, कॅरम, संगीत खुर्ची, दोरी उडी, तसेच विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळेस मान्यवरांचे स्वागत पर्यावरणपूरक पद्धतीने फुलझाडे व कागदी पिशवी देऊन करण्यात आले. शिक्षकांच्या स्पर्धा रायगड जिल्ह्यात प्रथमच होत असल्याचे मत अध्यक्ष दीपा परब यांनी व्यक्त केले. या स्पर्धेचे पारितोषिके सरपंच दिपाली नरेश पाटील व मा. उपसरपंच राजेश पाटील यांनी दिले.
या प्रसंगी वरिष्ठ विस्तार अधिकारी शिल्पा दास पवार, माजगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच दिपाली पाटील, उपसरपंच प्रांजल जाधव, मा.उपसरपंच राजेश पाटील, नरेश पाटील, बिर्ला कार्बन सी.एस.आर प्रमुख लक्ष्मण मोरे, सिप्ला सी.एस.आर च्या उल्का धुरी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माजगाव शाळेच्या उपशिक्षिका रेखा जाधव यांनी केले.
शिक्षकांना या स्पर्धांमधून गुण-कौशल्ये विकासाची प्रेरणा मिळेल.
– दीपाली पाटील, सरपंच,
ग्रूप ग्रामपंचायत माजगांव
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून, शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत.
– राजेश पाटील, मा. उपसरपंच