| पनवेल | वार्ताहर |
एका ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याची चेन लांबविल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. शहरातील लाईनआळी येथे राहणारे 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे आपली टपरी उघडून टपरीची साफसफाई करत असताना तेथे मोटार सायकलवरुन एक इसम आला व त्याने नोटांचे बंडल त्यांच्यासमोर काढून यातील 500 एक नोट आणि 100 च्या 5 नोटा काढल्या आणि या नोटा देवाला मंदिरात जावून दान करा असे सांगितले. व या नोटांवर तुमच्याकडील सोन्याचे दागिने ठेवा, यावेळी त्यांनी गळ्यातील सोन्याची चेन काढून त्याच्याकडे दिली असता हातचलाखीने त्याने नोटेवर सोन्याची चेन ठेवल्यासारखे केले आणि रब्बर लावून चेन गुंडाळलेली नोटांची पुडी पिशवीत टाकण्याचा बहाणा करून पिशवी त्या वृद्ध इसमाच्या हातात दिली. आणि 5 मिनिटाने नोटांची पुडी उघडा असे सांगितले व हातचलाखीने 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन नोटांसह पळवून नेल्याची घटना घडली आहे.