| रोहा | वार्ताहर |
1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने रस्ता सुरक्षा महिना अभियान राबविण्यात येते. यंदाहि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान अंतर्गत बुधवार (दि. 8) रोजी रोहे शहरात मोटारसायकल रॅली काढून मुख्य चौकच्या ठिकाणी सुरक्षा विषयी मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली.
सदर रस्ता सुरक्षा अभियान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माधव सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. शहरातील एसटी स्टँड़ ते रोहा तहसील, रोहा वनविभागपर्यंत मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या अभियानात हेल्मेड घालणे, सीट बेल्ड लावणे, दारू पिऊन गाडी चालवू नये, वाहतूकीचे सर्व नियम पाळणे, चिन्ह ओळख, सुरक्षित वाहन चालवणे इत्यादी संदर्भात मोटारवाहक निरीक्षक अनिस बागवान, दीपक ठाकरे, सह.मोटार वाहक निरीक्षक अमर शेटे, दिनेश ढोपणे, मंगेश चौधरी यांनी प्रवासी आणि विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले.