। उरण । वार्ताहर ।
रानसई येथील चादायले वाडी आदिवासी शाळेने कोमणादेवी ऑक्सिजन पार्कला भेट दिली. निसर्गातून काय शिकता येईल, हे आदिवासी बांधवांना किंवा विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज नाही. परंतु, मुख्याध्यापक प्रवीण पाटील यांनी मानवनिर्मित ऑक्सिजन पार्क कसा असतो, त्यात साकारणार्या नवीन संकल्पना काय आहेत, भविष्यात हा पार्क कसा असेल, हे दाखवण्यासाठी मानवनिर्मित ऑक्सिजन पार्क पाहण्यासाठी खास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पाटील, शिक्षिका प्रतिभा लहासे, शाळेच्या सहकारी अश्विनी कातकरी, सदाबहार दोस्ती ग्रुपचे हरिश्चंद्र म्हात्रे, सारडे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे आदी उपस्थित होते.