उद्या चणेरामध्ये हळदीकुंकू समारंभ

सोनी मराठी वाहिनीवरील कलाकारांची उपस्थिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या दैनिक कृषीवलच्या वतीने रोहा तालुक्यातील चणेरा येथेे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा बुधवारी (दि.31) सायंकाळी चार ते सात यावेळेत न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाला सोनी मराठी वाहिनीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. कृषीवल हळदीकुंकू समारंभाच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पहिल्यांदाच हा सोहळा चणेरामध्ये रंगणार आहे.

‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेतील निवेदिता म्हणजे अभिनेत्री एतशा सांझगिरी आणि अभिनेता यशोधन म्हणजे अशोक फळदेसाई, तसेच ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेतील बयो म्हणजे अभिनेत्री विजया बाबर उपस्थित राहणार आहे.

गेल्या अनेक वर्षांची हळदीकुंकूची परंपरा कृषीवलने जपली आहे. दरम्यान, बुधवारी (दि.31) चणेरामध्ये हळदीकुंकू समारंभ होणार आहे. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या मालिकेतील सिनेतारकांची उपस्थिती आकर्षण ठरणार आहेत. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version