हरिओमची टीम राज ठाकरे यांच्या भेटीला

| पाली/बेणसे । वार्ताहर ।

हरिओम चित्रपटासारखा ऐतिहासिक चित्रपट व निर्माते तयार होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ठाकरे यांनी हरिओम टीमचे निर्माते, अभिनेते व सह कलाकार यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

शिवप्रेमाने प्रेरित झालेल्या आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार्‍या नव्या युगातील मावळ्यांची कथा असलेल्या हरिओम चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, याबद्दल ठाकरे यांनी समाधान व्यक्त करीत टीमला आशीर्वाद दिले. नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्य व कर्मभूमी असलेल्या उंबरठ येथील पवित्र व ऐतिहासिक भूमीत अभिनेते हरिओम घाडगे व गौरव कदम यांनी ट्रेलर प्रदर्शित करून हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांना समर्पित करण्यात आला. या चित्रपटाला जनतेतून उत्स्फूर्त प्रेम मिळत आहे.

यावेळी मुख्य अभिनेता व निर्माता हरिओम घाडगे, दिग्दर्शक आशिष नेवालकर, मनोज येरूनकर व हरिओम चित्रपटातील कलाकार तसेच मराठी चित्रपट निर्माते फैजल भाई पोपेरे हजर होते.

Exit mobile version