‘या’ प्रसिद्ध गायकाची मृत्यूशी अपयशी झुंज

अवघ्या ४०व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

। हिस्सार । वृत्तसंस्था ।

हरियाणवी गायक राजू पंजाबी यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. गेल्या १० दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते.

राजू पंजाबींवर हिस्सारमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ते बरे होऊन घरी गेले होते, मात्र त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यांना कावीळ झाल्यामुळे यकृत आणि फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. राजू यांच्या निधनाची माहिती मिळताच चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ते सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

राजू पंजाबी यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी रावतसर खेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते सध्या आझादनगर, हिस्सार इथे राहत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांचे नातेवाईक आणि चाहते हिस्सारला पोहोचले. हरियाणवी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार हिस्सारला पोहोचले असून या दु:खात सहभागी झाले आहेत. राजू पंजाबी विवाहित असून त्यांना ३ मुली आहेत.

Exit mobile version