हाशिवरे शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन

| अलिबाग । वार्ताहर ।
हाशिवरे हितवर्धक मंडळ, हाशिवरे, संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वैजाळी प्राथमिक शाळा, मराठी माध्यम वैजाळी इंग्लिश मीडियम स्कूल संकुलात, मंगळवार (27) शाळेच्या भव्य श्रीसमर्थ सभागृहामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. स्नेहसंमेलनाचा वार्षिक पारितोषिक वितरणास चंद्रकांत पाटील याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरोज डाकी, संजीवन म्हात्रे, आल्हाद पाटील ,ज्ञानेश्‍वर मोकल,सुबोध मोकल, निशिकांत मोकल, शैलेश मोकल,माजी प्राचार्य कडवे, माजी प्रा. देवघरकर, माजी प्रा. जोशी, संपदा पाटील, स.ग. पाटील, बी.डी.गायकवाड तसेच इंग्रजी व मराठी माध्यम मुख्याध्यापिका आणि शिक्षकवृंद, शिक्षक पालक संघ सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विविध उपक्रमातील शिक्षक व विद्यार्थी यांचा गुणगौरव करण्यात आला. आदर्श शिक्षिका खरसंबळे, आदर्श शिक्षक कोळी यांना सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय कुस्तीस्पर्धेसाठी निवड झालेल्या तन्मयी पाटील हिचा विशेष सत्कार झाला. क्रीडा शिक्षकांचे विशेष कौतुक करण्यात आले. अर्चना ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले व श्री. कुलकर्णी व सौ. नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

Exit mobile version